सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या घोषणा करणार याची जोरदार चर्चा रंगली होती. शिवाय, राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नुकसान भरपाईचीही मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.देवेंद्र फडणवीस दुपारी २ वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील.
#Maharashtra #maharashtrabudget #Budget2023 #DevendraFadnavis #EknathShinde #maharashtraassembly #hwnewsmarathi